प्रेमभाव, वक्तशीरपणा आणि नियमित दत्तगुरूंचा नामजप करणारे कर्नाटक (जिल्हा शिवमोगा) येथील कै. जयंत हरगी (वय ६५ वर्षे) !

८.८.२०२२ या दिवशी कर्नाटक (जिल्हा शिवमोग्गा) येथील श्री. जयंत हरगी (वय ६५ वर्षे) यांचे हृदयविकाराने निधन झाले. २३.८.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या पत्नीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि कुटुंबियांना निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

कै. जयंत हरगी

१. श्रीमती रेवती हरगी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे) (कै. जयंत हरगी यांच्या पत्नी)

१ अ. प्रेमभाव : ‘कोणतेही साधक आमच्या घरी येणार असतील, तर यजमान (कै.) जयंत हरगी त्यांना बसस्थानकावरून घेऊन यायचे आणि सेवा पूर्ण झाली की, त्यांना परत नेऊन सोडायचे. साधक घरी आल्यावर ते आनंदाने त्यांच्या समवेत रहायचे.

१ आ. नियोजनकौशल्य : कोणतेही काम वेळेवर व्हायला हवे; म्हणून ते पूर्ण नियोजन करायचे. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती नियोजनबद्ध असत. त्यांनी मृत्यूच्या दिवसापर्यंत मळ्यात (बागेत) जाऊन काम केले.

१ इ. व्यष्टी साधना : ते प्रतिदिन सकाळी नियमितपणे दत्तगुरूंचा नामजप करायचे आणि प्रतिदिन पूजा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीही पूजा करायचे. ते नियमित कापूर, अत्तर आणि नामजपादी उपाय करायचे.

१ ई. सेवेतील सहभाग : कोणाकडून पार्सल आणायचे असल्यास ते घेऊन येणे आणि योग्य ठिकाणी पोचवणे, तसेच साधक अन् धर्मप्रेमी यांना काही द्यायचे असेल, तर ते नेऊन देत असत. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदारांनी वर्गणी किंवा कोणी विज्ञापनाचे पैसे दिले असतील, तर ते पैसे वेळेवर आणून देत असत. स्वतःही अर्पण आणि विज्ञापन देत असत. ते आकाश कंदील बनवून साधकांना घरोघरी जाऊन देण्याची सेवा करत असत.

१ उ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१ उ १. यजमानांच्या निधनानंतर पू. रमानंद गौडा यांनी धीर देऊन नामजप देणे आणि पू. उमेश अण्णा यांनीही दूरभाष करून सांत्वन करणे अन् त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पाठीशी आहेत’, असे वाटणे : ‘यजमानांचे निधन झाल्यानंतर सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी मला धीर देऊन नामजप दिला. नंतर मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ माझ्याजवळ ठेवून पू. रमानंद अण्णांनी दिलेला नामजप केला. सनातनचे १७ वे संत पू. उमेश अण्णा यांनीही मला दूरभाष करून माझे सांत्वन केले. मला त्यांनी सांगितले, ‘‘काळजी करू नका. देव समवेत आहे.’’ तेव्हा मला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या पाठीशी आहेत’, असे वाटले.

१ उ २. स्थानिक साधक आणि अनेक बाहेरच्या व्यक्ती यांना जाणवलेली सूत्रे : अनेक लोक आणि स्थानिक साधक यांना यजमानांना पहातांना ते जिवंत असून त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य असल्याचे जाणवत होते. ‘बाहेरून रडत आलेले लोक यजमानांना पाहून रडायचे थांबले’, असे काही जण सांगत होते. बरेचसे साधक आणि आलेल्या बर्‍याच लोकांना संपूर्ण घर चैतन्यमय अन् सजीव वाटले.’

२. श्री. अविनाश जयंत हरगी (कै. जयंत हरगी यांचा मुलगा)

‘मी जेव्हा माझ्या वडिलांना पाहिले, तेव्हा ‘मला ते जिवंत असून शांत झोपले आहेत’, असे वाटले. तेव्हा ‘हे साधनेमुळे शक्य झाल्याचे लक्षात येऊन ‘मी आणखीन साधना केली पाहिजे’, असे मला वाटले.’

३. सौ. अश्विनी (कै. जयंत हरगी यांची मुलगी)

अ. ‘वडिलांचा चेहरा पाहिल्यावर मला आनंद वाटत होता. ‘ज्या खोलीत माझ्या वडिलांचे पार्थिव ठेवले होते, त्या खोलीत बसून मी नामजप करावा’, असे मला वाटले. तिथे बसल्यावर माझा नामजप आपोआप होत होता.

आ. मी त्यांना उदबत्ती ओवाळत असतांना त्यांच्या डोक्यावर ठेवलेले फूल खाली पडले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.

इ. ज्या खोलीत वडिलांचे पार्थिव ठेवले होते, तिथे दिवसभर सुगंध येत होता.

ई. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तांदुळाचे पीठ पसरून ठेवले होते. सकाळी मी त्या पिठाकडे पाहिले, तर मला त्यात गायीचे पाय आणि आतमध्ये ‘ओम’चा आकार दिसला.’

(‘अंत्यसंस्कार झाल्यानंतर कोपर्‍यात पीठ पसरून ते झाकून ठेवतात. ‘मृताचा आत्मा त्या पिठावर ठसे उमटवून जातो’, असे मानतात. पिठावर जे ठसे उमटतात, त्यावरून ‘त्याला पुढचा जन्म कोणता मिळणार ?’, ते समजते.’ – संकलक)

४. श्रीमती मालती नारायण (श्रीमती रेवती हरगी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे) यांची लहान बहीण)

‘माझ्या बहिणी समवेत आधार द्यायला ‘सनातन संस्थेचे साधक आहेत’, हे पाहून पुष्कळ समाधान वाटणे : ‘मला बहिणीच्या घरी येतांना मला पुष्कळ दुःख होत होते. माझ्या मनात ‘बहिणीचे सांत्वन कसे करावे ?’, याविषयी पुष्कळ विचार येत होते. घरी आल्यावर ‘बहिणीला आधार द्यायला सनातन संस्थेचे साधक आहेत’, हे पाहून मला पुष्कळ समाधान वाटले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.८.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक