धर्माचरण करणारा आणि देवावर श्रद्धा असणारा जळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. कार्तिक विशाल लिगाडे (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. कार्तिक विशाल लिगाडे हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. कार्तिक विशाल लिगाडे महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ६२ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.८.२०२२)

श्रावण कृष्ण नवमी (२०.८.२०२२) या दिवशी कु. कार्तिक विशाल लिगाडे याचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. आरती विशाल लिगाडे यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. कार्तिक लिगाडे

कु. कार्तिक विशाल लिगाडे याला ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. धर्माचरण करणे

‘कार्तिकला टिळा लावायला आणि नमस्कार करायला आवडते. त्याला देवांचे चित्र पायदळी किंवा मार्गावर (रस्त्यावर) पडलेले दिसल्यास तो ते उचलून घरी आणतो आणि ‘ते चित्र पायदळी येणार नाही’, अशा ठिकाणी ठेवतो.

२. धर्माभिमान

तो शिवाजी महाराज यांच्याविषयी ‘आपले महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज’, असे आदराने म्हणतो. तो क्रांतीकारकांविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारतो.

३. देवाची आवड

तो देवी-देवतांच्या गोष्टी आवडीने ऐकतो आणि इतरांनाही सांगतो.

४. देवावरील श्रद्धा

सौ. आरती लिगाडे

अ. तो रात्री झोपतांना प्रार्थना करून नामजप करत झोपतो. तो सकाळी उठल्यावर म्हणतो, ‘‘प्रार्थना केली; म्हणून देवाने मला लवकर झोपवले.’’

आ. मागील काही मासांत तो सायकल चालवायला घाबरत होता. तेव्हा त्याने प्रार्थना करून सायकल चालवण्यास आरंभ केला. आता तो नामजप करत सायकल चालवतो आणि त्याला सायकल चालवण्याची भीती वाटत नाही.

५. अन्नाप्रती भाव

तो त्याच्या लहान बहिणीला सांगतो, ‘‘देवाने दिलेले अन्न फेकू नये.’’

६. जाणवलेला पालट 

अ. तो पूर्वी न्यूनगंडामुळे घरातील आणि बाहेरच्या व्यक्तींना घाबरायचा. आता त्याचा न्यूनगंड अल्प झाला आहे. तो घरात सगळ्यांशी आपुलकीने बोलतो.

आ. त्याला पूर्वी फार राग येत असे. आता त्याला राग आल्यावर त्याची जाणीव होते आणि तो प्रार्थना करून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो.

– सौ. आरती विशाल लिगाडे (कार्तिकची आई), जळगाव (१८.५.२०२२)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.