पाँडिचेरी येथील युवकाचा गोव्यात अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय

पणजी, १६ ऑगस्ट (वार्ता.) – पाँडिचेरी येथील एका युवकाचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. या युवकाचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय आहे.

प्राप्त माहितीनुसार संबंधित युवक त्याच्या इतर ३ मित्रांसमवेत १३ ऑगस्ट या दिवशी गोव्यात आला होता. गोव्यात वास्तव्यास असतांना संबंधित युवक आणि त्याच्या गटाने साळगाव आणि कळंगुट येथे विविध ठिकाणी रात्रीच्या पार्ट्यांना भेटी दिल्या होत्या. अमली पदार्थाच्या अतीसेवनाने युवकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उत्तर गोवा पोलिसांनी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला नव्हता.

संपादकीय भूमिका

  • अमली पदार्थ व्यवसायामुळे अपकीर्त झालेला गोवा !
  • अमली पदार्थ व्यावसायिकांवर अनेक वेळा कारवाई करूनही अतीसेवन होईल एवढ्या प्रमाणात अमली पदार्थ पर्यटकांना कसे मिळतात ?