महागाई आणि गुन्हेगारी ही प्रमुख कारणे
वॉशिंग्टन (अमेरिका) – सध्या अमेरिकी नागरिक मोठ्या प्रमाणात इटली, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीस, फ्रान्स यांसारख्या युरोपीय देशांत स्थायिक होत आहेत. या देशांतील त्यांची संख्या आता ४५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या स्थलांतराचे मुख्य कारण ‘अमेरिकन ‘डॉलर’चे मूल्य अधिक वधारणे’, हे आहे. ‘डॉलर’चे मूल्य वाढत असल्यामुळे अमेरिकी नागरिक दुसर्या देशांत स्थायिक होऊन अल्प पैशांत प्रशस्त जीवन जगण्यास प्राधान्य देत आहेत.
१. कोरोना काळात अमेरिकेत ४ कोटींहून अधिक जणांनी नोकरी सोडली. या काळात नागरिकांनी महागड्या उपचारांमुळे रुग्णालयांत जाणेही टाळले. त्यांनी नियमित तपासणीकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे आता चांगले जीवन जगण्यासाठी त्यांचे पाय युरोपीय देशांकडे वळत आहेत.
२. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकी नागरिकांच्या मते अमेरिकेत महागाईनंतर ‘बंदूक संस्कृती’ ही मोठी समस्या आहे. अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटना सर्रास सतत घडत असतात. याउलट युरोपीय देशांत गुन्हेगारीचे प्रमाण अल्प आहे. तेथे अनेक कल्याणकारी योजना असून घरेही अल्प किमतीत मिळतात.