मुंबई – अन्वेषणात उत्कृष्ट कामगिरी केल्याविषयी राज्यातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री’ पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने निवड केलेल्या देशातील १५१ पोलीस अधिकार्यांमध्ये महाराष्ट्रातील या पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. पदक घोषित झालेल्या पोलिसांमध्ये उपपोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, दिलीप पवार, दीपशिखा वारे, सुरेशकुमार राऊत, जितेंद्र वनकोटी, समीर अहिरराव, अजित पाटील, साहाय्यक निरीक्षक राणी काळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा सामावेश आहे.
विविध गुन्ह्यांच्या अन्वेषणातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या पोलीस अधिकार्यांना आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी वर्ष २०१८ पासून केंद्रीय गृहविभागाकडून हा पुरस्कार दिला जात आहे. वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते. या पुरस्काराचे वितरणही स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.