‘पुणे-सोलापूर एक्सप्रेस’ सेवा १५ सप्टेंबरपासून पूर्ववत् होणार !

सोलापूर – प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने १५ सप्टेंबरपासून रेल्वे क्रमांक ११४१७/११४१८ ‘पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस’ची सेवा पूर्ववत् करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ११४१७ ‘पुणे–सोलापूर एक्सप्रेस’ १५ सप्टेंबरपासून पुणे येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि सोलापूरला दुसर्‍या दिवशी सकाळी ७.५५ वाजता पोचेल, तसेच गाडी क्रमांक ११४१८ सोलापूरहून १५ सप्टेंबरपासून सकाळी ११.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे सायंकाळी ७.२५ वाजता पोचेल.

ही गाडी हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, मलठण, भिगवण, जिंतूर रोड, पारेवाडी, वाशिंबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुर्डूवाडी, वडशिंगे, माढा, वाकाव, अनगर, मलिकपेठ, मोहोळ, मुंढेवाडी आणि पाकणी या स्थानकांवर थांबणार असून या गाडीला द्वितीय श्रेणीतील १२ डबे असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.