स्वातंत्र्यसंग्रामाचे चार पैलू

१. राष्ट्रीय पुनरुत्थान : ‘महर्षी स्वामी दयानंद सरस्वती, श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी जनतेमध्ये स्वाभिमान अन् आत्मविश्वासाचा विकास करून राष्ट्रीय विचारधारणेला प्रोत्साहित केले.

२. समाज सुधारण्यासाठी आंदोलने : आर्यसमाज, ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज, महादेव गोविंद रानडे इत्यादींनी समाजातील जातीय तेढ, जडवाद, रूढी आणि असमानता यांना दूर करण्याचे प्रयत्न केले.

३. राजकीय आणि घटनात्मक कार्य : लोकमान्य टिळक, म. गांधी, लाला लाजपत राय आणि अन्य लोक यांनी राजकारण अन् घटनाविषयक उल्लेखनीय कार्य केले आहे.

४. सशस्त्र संघर्ष : नाना पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, चाफेकर बंधू, स्वा. सावरकर, चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस, डॉ. हेडगेवार, आणि अन्य शेकडो वीरांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाहुती दिली.’