भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे !

चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार

मुंबई – चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात आल्याने भाजपने नवीन कार्यकारिणी घोषित केली आहे. भाजपचे आशिष शेलार यांना आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता मुंबईचे प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने चांगले काम केले होते. त्यामुळे आगामी निवडणूक लक्षात घेता पुन्हा त्यांच्याकडे हे उत्तरदायित्व देण्यात आले आहे.