पुणे – येथील ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’च्या ‘बावधन कॅम्पस’मध्ये शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनी, महिला शिक्षक यांनी ५०० झाडांना राख्या बांधल्या. झाडे आपल्याला संरक्षण आणि प्राणवायू (ऑक्सिजन) देतात, आपले नैसर्गिक पोषण करतात. त्यामुळे झाडांना राखी बांधून ‘रक्षाबंधन’ साजरा केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ देशी आणि औषधी झाडे लावण्यात आली. ‘हर घर तिरंगा’च्या धर्तीवर ‘हर वृक्षपर तिरंगा’ हा नारा देत विद्यार्थ्यांनी झाडांवर झेंडाही उभारला.
संपादकीय भूमिकाकेवळ हिंदूंचे सण-उत्सव जवळ आले की, त्यामध्ये हस्तक्षेप करणारी कथित सुधारणावादी मंडळी अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळेस मात्र मूग गिळून गप्प असतात. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे शास्त्र समजून न घेता चुकीच्या पद्धतीने सण साजरा करून ते या सण-उत्सवातून मिळणार्या चैतन्यापासून वंचित रहात आहेत, हे दुर्दैवी ! |