वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘सर तन से जुदा’ची (शिर धडापासून वेगळे करण्याची) घोषणा करत संपूर्ण देशात एकामागून एक हिंदूंची वेचून हत्या केली जात आहे. कानपूर येथील फ्लोरेट्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ‘कलमा’ (इस्लामी प्रार्थना) शिकवला जात असून बिहार, झारखंड, बंगाल आदी अनेक राज्यांतील सरकारी शाळांमध्ये रविवारीऐवजी शुक्रवारी सुटी दिली जात आहे. हिंदीच्या जागी उर्दूचा वापर केला जात आहे. हे पहाता हिंदूंच्या हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ इत्यादी जिहादी संघटनांवर तात्काळ बंदी घालावी आणि शाळांचे इस्लामीकरण करणार्या दोषी प्रशासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांना निलंबित करून त्यांचे वेतन आणि भत्ते आदी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी वाराणसी येथील जिल्हाधिकार्यांद्वारे केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अरुण मौर्य, अधिवक्ता मदन मोहन यादव, श्री. राजन केसरी, सनातन संस्थेचे श्री. प्रमोद गुप्ता, श्री. रीतेश गुप्ता आदी उपस्थित होते. भविष्यात अनेक हिंदू नेते जिहादींच्या सूचीवर असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा हिंदू नेत्यांची सूची करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.