मुंबईतील सर्व शाळांची रक्षाबंधनाची सुटी रहित !

  • मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा आदेश

  • सुट्यांची संख्या अधिक झाल्याने रक्षाबंधनाची सुटी रहित केल्याचे सांगितले कारण

मुंबई – मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी पालिका, खासगी आणि विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थी, शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांची ११ ऑगस्ट या दिवशीची रक्षाबंधनाची सुटी रहित केली. पालिकेच्या शिक्षण विभागाने हे परिपत्रक सर्व शाळांना पाठवले आहे. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे. ४ ऑगस्ट या दिवशी कंकाळ यांनी हा आदेश काढला.

या आदेशात ‘सुट्यांची संख्या अधिक होत असल्याने प्रत्येक वर्षी दिली जाणारी रक्षाबंधनाची सुटी रहित करत आहोत’, असे नमूद करण्यात आले आहे. ऑगस्ट मासात एकूण ५ सुट्या आहेत; परंतु नवीन परिपत्रकानुसार आता ४ सुट्ट्या असतील.

सुटी घोषित करा, अन्यथा आंदोलन ! – शिक्षक भारती संघटना

‘हे परिपत्रक रहित करून सुट्टी घोषित करावी, अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन करू’, अशी चेतावणी ‘शिक्षक भारती संघटने’चे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या सणाची नियोजित सुटी रहित करणारे शिक्षण अधिकारी कधी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी असे धाडस दाखवतील का ?