हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला धमकावणार्‍या दानिश मन्सुरी याला अटक

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’!

इंदूर (मध्यप्रदेश) – शहरातील दानिश मन्सुरी या १९ वर्षांच्या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून १३ वर्षांच्या हिंदु मुलीला ४ मासांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढलेे. त्यानंतर त्याने तिची अश्‍लील छायाचित्रे काढून तिला धमकावण्यास (‘ब्लॅकमेल’ करण्यास) चालू केले. तसेच तिच्यावर धर्मांतर करून लग्न करण्यास दबाव आणू लागला. अंततः पीडित मुलीने ही घटना तिच्या आईला सांगितली. हे प्रकरण हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पोलीस यांच्यापर्यंत पोचल्यावर परिसरात तणाव निर्माण झाला. दानिश याला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलीने सांगितले, ‘मी औषध घेण्यासाठी मेडिकलच्या दुकानात गेली होती. तिथे दानिश याने स्वत: हिंदु असल्याचे सांगून माझ्याशी ओळख केली. साहाय्य करण्याच्या निमित्ताने त्याने माझ्याशी संवाद साधला. त्यानंतर तो भ्रमणभाषवर संपर्क साधू लागला. एकदा दानिशने मला भेटायला बोलावले. तेथे त्याने माझ्यासोबत अश्‍लील छायाचित्रे काढली. तसेच माझ्यासोबत अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर त्याने स्वत:ची खरी ओळख सांगितली आणि माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव आणू लागला.’ दानिश याच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’, विनयभंग आणि ‘पोस्को’ कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मध्यप्रदेशात ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या अंतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे.