भारतीय सागरी सीमेमध्ये घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानी युद्धनौकेला भारताने पिटाळून लावले !

गांधीनगर (गुजरात) – गुजरातच्या समुद्रात घुसखोरी करणार्‍या पाकच्या ‘आलमगीर’ या युद्धनौकेला भारताचे डॉर्नियर विमान आणि तटरक्षक दलाचे सैनिक यांनी पिटाळून लावले. ही घटना गेल्या मासात घडल्याचे आता सूत्रांकडून समोर आले आहे.

१. आलमगीर युद्धनौकेने गुजरातलगतच्या भारतीय समुद्रात घुसखोरी केल्याचे पाहून सागरी सीमेवर गस्त घालणार्‍या डॉर्नियर विमानाने तिला भारतीय सीमेच्या बाहेर जाण्याची चेतावणी दिली. याकडे पाकच्या या युद्धनौकेने दुर्लक्ष केले. विमानाच्या वैमानिकाने पाकिस्तानी युद्धानौकेचा हेतू जाणून घेण्यासाठी रेडिओ संचार सेटवर कॉलही केला; पण पाकिस्तानी युद्धनौकेच्या कॅप्टनने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर गस्तीपथकांनी आक्रमक रूप धारण केल्यानंतर ही युद्धनौका मागे फिरली.

२. आलमगीर युद्धनौका वर्ष २०१० मध्ये अमेरिकेने पाकला दिली होती. तिच्यावर २ हेलिकॉप्टर तैनात करता येतात. अमेरिकेहून पाकमध्ये येतांना या युद्धनौकेने स्पेन, तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्या नौदलासमवेत युद्धाभ्यास केला आहे.

संपादकीय भूमिका

आकाश, भूमी आणि पाणी या मार्गांनी भारतात सातत्याने घुसखोरी करणार्‍या पाकमध्ये आता भारताने एकदाच घुसून त्याला कायमचा धडा शिकवावा !