केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सैनिकाने सहकार्‍यांवर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ

कोलकाता (बंगाल) – येथील ‘इंडियन म्युझियम’मध्ये ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’च्या (‘सी.आय.एस्.एफ्.’च्या) सैनिकाने त्याच्या सहकार्‍यांवर ‘एके ४७’ रायफलद्वारे केलेल्या गोळीबारात साहाय्यक उपनिरीक्षक रणजीत कुमार सरानी यांचा मृत्यू झाला, तर साहाय्यक कमांडंट सुवीर घोष घायाळ झाले. ए.के. मिश्रा असे गोळीबार करणार्‍या सैनिकाचे नाव आहे.

गोळीबाळ झाल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मिश्रा याला अटक केली. ‘हा गोळीबार का करण्यात आला ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून मिश्रा याची चौकशी केली जात आहे.