भगवे कपडे, गळ्यात नाग आणि भगवान शिवाचा जयघोष करत भीक मागणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

मुसलमानांचा आता ‘भीक जिहाद’ !

बदायू (उत्तरप्रदेश) – येथे भगवे कपडे घालून, गळ्यात नाग धारण करून आणि भगवान शिवाचा जयघोष करून भीक मागणार्‍या दोघा मुसलमानांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पशूप्रेमींनी तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. वनाधिकार्‍यांनी या दोघांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी प्रथम ते सांगण्याचे टाळले. नंतर दबाव आणल्यानंतर त्यांनी त्यांची नावे आस महंमद आणि फरमान असल्याचे आणि ते नूरपूर येथील रहाणारे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून २ नाग आणि १ मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, ते जंगलातून नाग पकडून आणतात आणि त्यांचे विष काढून भीक मागण्यासाठी त्यांना वापर करतात.