उत्तरप्रदेश पोलिसांकडून विहिंपचे सह जिल्हामंत्री यांना अमानुष मारहाण !

विहिंपचा आरोप

हरदोई (उत्तरप्रदेश) – येथे २ तरुणांमधील वाद मिटवण्यासाठी ३ ऑगस्टच्या रात्री विश्व हिंदु परिषदेचे सह जिल्हामंत्री अमन सिंह चौहान येथील पोलीस ठाण्यात गेले होते. दोन्ही गटांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी चौहान यांनाच अमानुष मारले. यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात प्रविष्ट करावे लागले. त्यांना एवढी मारहाण झाली होती की, नंतर लक्ष्मणपुरी येथे हलवावे लागले, असा आरोप विश्व हिंदु परिषदेचे हरदोई जिल्हा मंत्री डॉ. आशिष माहेश्वरी यांनी केला.

सौजन्य प्रशांती न्युज

डॉ. माहेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील शाहाबाद येथे राजा आणि आशू या दोन तरुणांमध्ये वाद झाला. या प्रकरणी हिंदु असलेल्या राजाची बाजू घेण्यासाठी चौहान पोलीस ठाण्यात पोचले होते; परंतु तेथील पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांनी चौहान यांनाच अमानुष मारहाण केली.

दुसरीकडे पोलीस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी म्हटले की, राजाची बाजू घेण्यासाठी आलेल्या चौहान यांची दुसर्‍या पक्षातील लोकांशी मारामारी झाली. यामध्ये चौहान घायाळ झाले. विहिंपने केलेल्या आरोपांवर सिंह म्हणाले की, आरोपांचे अन्वेषण करून दोषींविरोधात कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका 

  • जर विहिंपच्या आरोपात तथ्य आढळले, तर संबंधित पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !
  • एरव्ही मुसलमान धर्मगुरु अथवा नेते यांच्यासमोर नांगी टाकणारे पोलीस हे हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या विरोधात मात्र कठोर कारवाई करतात, हे लक्षात घ्या !