‘८ दिवसांत पूर्ण कुटुंबाला ठार करू !’ – उत्तरप्रदेशातील हिंदूला धमकी

अज्ञाताने दरवाजावर लावले धमकीचे पत्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील बरेली जिल्ह्यात असलेल्या सिरौली भागातील केशवपूर गावात दिनेश पंडित यांच्या घराबाहेर धमकीचे पत्र लावल्याचे आढळले. यामध्ये पंडित कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे गावातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची सूचना मिळताच पोलीस अधिकारी चमन सिंह चोपडा यांनी पंडित कुटुंबाला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. ‘लवकरच आरोपीला पकडण्यात येईल’, असेही चोपडा म्हणाले.

दिनेश पंडित यांच्या घराबाहेर दरवाजावर चिकटवलेल्या पत्रात लिहिले आहे की, दिनेश पंडित, तू असे मानणार नाहीस. गप्प बस अन्यथा ८ दिवसांच्या आत तुझ्या कुटुंबाला ठार करू. नंतर कुणीच समोर येणार नाही. हिंदूंची बाजू घेणे सोडून दे. तुझ्यासाठी एकही हिंदु पुढे येणार नाही. आजच्या दिनांकाला गावातील एकही व्यक्ती तुझ्यासमवेत नाही. जर सर्वांना साहाय्य करत राहिलास, तर १०० टक्के मारला जाशील.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांना जिवे मारण्याच्या अशा धमक्या मिळणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • प्रखर हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंना जीव मुठीत धरून रहावे लागणे अपेक्षित नाही ! संबंधित धर्मांधाला पकडून कठोर शिक्षा होणे आवश्यक !