परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ प्राप्त !

या शोधनिबंधाचे सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य) असून संशोधन गटाच्या सदस्या सौ. श्वेता क्लार्क यांनी त्याचे सादरीकरण केले. परिषदेत या शोधनिबंधाला ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ७७ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. याआधी एकूण १० आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.

१. परिषदेतील ‘सर्व सहभागी सदस्यांसाठी उपस्थित असणे अनिवार्य असलेले सत्र’ (Plenary session) यामध्ये ‘मुलांच्या क्षमतेचा कमाल विकास होण्याच्या दृष्टीने पालकांसाठी प्रभावी मानसिक आणि आध्यात्मिक तंत्रे’, हा विषय मांडण्यात आला.

२. वरील परिषदेत विश्वविद्यालयाच्या वतीने ‘पालक आणि शिक्षणतज्ञ यांनी उत्तरदायी युवक बनवण्याच्या दृष्टीने किशोरवयीन मुलांचे संगोपन कसे करावे ?’, या विषयावरील एक कार्यशाळाही घेण्यात आली.