मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी फलक लावून शहराचे विद्रूपीकरण !

अनधिकृत फलक लावणार्‍यांवर गुन्हे नोंद करणार ! – जयंत नाईक नवरे, पोलीस आयुक्त

नाशिक – शहरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने अनधिकृत फलक लावले आहेत. शहराच्या विद्रूपीकरणात भर घालणार्‍या या अनधिकृत फलकांनी पोलीस आणि महापालिका यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. याविषयी पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे म्हणाले की, शहरात अनधिकृत फलक लागले असतील, तर त्याची चौकशी करण्यात येईल. फलक लावण्यासाठी अनुमती घेतली नसेल, तर गुन्हे नोंद केले जातील. कुणाचीही गय केली जाणार नाही. माजी पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश रहित केलेले नाहीत.

अनधिकृत फलकांच्या विरोधात उच्च न्यायालयाने थेट कारवाईचे आदेश दिल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वतंत्र आदेश काढून थेट कारवाई करत शहर फलकमुक्त केले होते.