‘सनातनच्या आश्रमातील साधकांचे हास्य कृत्रिम नसून खरोखर आहे आणि हे त्यांना साधनेमुळे मिळालेल्या आनंदामुळे आहे’, असे एका कलाकाराने सांगणे

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

‘हल्ली नृत्य आणि संगीत या क्षेत्रांतील अनेक मान्यवर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी येतात. त्या वेळी ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमालाही भेट देतात. त्यांपैकी बरेच जण सांगतात, ‘‘आश्रमातील साधक पुष्कळ आनंदी असतात. बाहेर समाजात बघायला मिळत नाही, असे हास्य आश्रमातील साधकांच्या तोंडवळ्यावर पहावयास मिळते.’’ एका कलाकाराने सांगितले, ‘‘एखादी व्यक्ती काही वेळ हसण्याचे नाटक करू शकेल; पण प्रत्येक वेळी ती हे करू शकणार नाही. कृत्रिमपणे हसल्याने काही वेळाने तोंड दुखते. त्यामुळे ‘येथील साधकांचे हास्य कृत्रिम नसून खरोखर आहे आणि हे त्यांना साधनेमुळे मिळालेल्या आनंदामुळे आहे’, हे लक्षात येते.’’

त्या कलाकाराने ‘समाजातील लोकांचे हास्य आणि साधकांच्या तोंडवळ्यावरील आनंदाचे हास्य यांतील भेद अतिशय मार्मिक भाषेत सांगितला’, असे माझ्या लक्षात आले.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.३.२०२२)