बारी मेहदी याच्याकडून हिंदु युवतीची हत्या !

बांगलादेशातील ‘लव्ह जिहाद’चा बळी !

ढाका (बांगलादेश) – येथील शेरपूर जिल्ह्यात असलेल्या नलिताबाडी उपजिल्ह्यात बारी मेहदी नावाच्या धर्मांध मुसलमानाने अनुराधा सेन या हिंदु युवतीचे अपहरण करून तिची हत्या केली. यानंतर त्याने तिचे छायाचित्र फेसबूकवरून प्रसारित करून पोस्टमध्ये लिहिले की, ‘तिला शोधण्याची आवश्यकता नाही. तिचा मृत्यू झाला आहे.’ पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

अनुराधा येथील बांकुरा हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकत होती. सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळाल्याचे खोटे कारण सांगत आरोपी बारी मेहदी याने तिला शाळेत बोलावले. ती तिथे गेल्यावर त्याने तिचे अपहरण केल्याचा पोलिसांना संशय आहे. अनुराधाच्या भावाने पोलिसांना सांगितले, ‘‘काही दिवसांपूर्वी बारी मेहदी याने मला संपर्क करून ‘अनुराधाचे बारीवर प्रेम होते; पण आता ती अन्य कुणावर तरी प्रेम करते. हे अयोग्य आहे’, असे सांगत मलाही धमकावले होते.’’

संपादकीय भूमिका 

बांगलादेशात असुरक्षित हिंदू !