६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मप्रेमींना संपर्काच्या वेळी कार्यकर्त्यांना जाणवलेली सूत्रे
१. कु. पूजा धुरी, जिल्हा सिंधुदुर्ग
‘देवाच्या कृपेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिज्ञासू धर्मप्रेमींना संपर्क करण्याच्या नियोजनाची सेवा मला मिळाली. हा दौरा म्हणजे एक दैवी नियोजन होते. ‘सेवेचे नियोजन करतांना सेवेची व्याप्ती किती मोठी आहे’, हे माझ्या लक्षात आले.
अ. निरंजनदादा धर्मप्रेमींशी बोलतांना त्यांची प्रकृती ओळखून त्यांना राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांचे गांभीर्य सांगायचे.
आ. ‘धर्मप्रेमींना साधनेच्या पुढच्या टप्प्यात नेण्यासाठी त्यांना त्याची कला आणि क्षमता यांनुसार साधनेचे पुढील प्रयत्न सांगणे महत्त्वाचे आहे’, हे मला शिकायला मिळाले.
इ. ‘संपर्क करतांना नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लागत असल्यास त्या परिस्थितीत स्थिर रहाणे, स्वतःला येणार्या अडचणी विचारून घेणे, नियोजनात पालट झाल्यास ते स्वीकारणे’, यांतून आपली साधना होणार आहे’, हे मला दादांकडून शिकायला मिळाले.
२. कु. नीना कोळसुलकर, खारेपाटण, जिल्हा सिंधुदुर्ग.
२ अ. श्री. निरंजन चोडणकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१. निरंजनदादांनी विषय सांगितल्यावर धर्मप्रेमींचा प्रतिसादही चांगला मिळाला. त्यातून ‘प्रत्येक क्षणी देवाला जेवढे आळवू, तेवढे अल्प आहे’, हे शिकता आले.
२. दादा प्रत्येक धर्मप्रेमीशी प्रेमाने आणि आत्मीयतेने बोलायचे.
३. ते प्रत्येक धर्मप्रेमीशी नवीन विषयावर बोलायचे. दादांच्या बोलण्यातून त्यांची देवांप्रती दृढ श्रद्धा जाणवायची. त्यामुळे तो भावसत्संगच होत होता.
४. ‘धर्मप्रेमींना भेटल्यानंतर आम्हाला त्यातून काय जाणवले ?’, याचाही दादा आमच्याकडून अभ्यास करवून घ्यायचे, तसेच ‘त्यात काही त्रुटी किंवा चुका झाल्या का ?’, असे ते आम्हाला विचारायचे. यातून आमची प्रगती करून घेण्याची दादांची तळमळ जाणवायची.
२ आ. कु. पूजा धुरी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१. संपर्काच्या वेळी पूजाताईने निरंजनदादांनी धर्मप्रेमींना सांगितलेली सर्व सूत्रे लिहून घेतली.
२. पूजाताई मधे मधे लघुसंदेश पाठवणे आणि भ्रमणभाष करून विचारणे, अशा सेवाही करत होती. त्यातून ‘सेवेशी एकरूप कसे व्हायचे ?’, हे मला शिकता आले.
३. आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या हृदयातील शब्द पूजाताईने कागदावर उतरवले आणि निरंजनदादांविषयी सुंदर कविता लिहिली. त्यातून ‘सर्व प्रशिक्षक एकरूप आहेत’, असे मला जाणवले. आम्ही ती कविता भेट म्हणून दादांना दिली. तेव्हा ‘श्रीकृष्ण प्रत्येक जिवाला किती आनंद देतो !’, हे मला अनुभवता आले.
२ इ. संपर्काच्या वेळी कु. प्राची शिंत्रेताई आमच्या समवेत होती. तिच्यातील ‘अभ्यासूवृत्ती, मनमोकळेपणाने बोलणे, अल्प अहं’, असे अनेक गुण मला शिकता आले.
२ ई. धर्मप्रेमींनाही निरंजनदादांना भेटण्याची ओढ होती. ‘त्यांच्या विविध प्रयत्नांतून परिस्थितीवर मात कशी करू शकतो ?’, हे मला शिकता आले.
२ उ. धर्मप्रेमींना संपर्क होणे, हे देवाने मला समष्टी सेवेत पुढे नेण्यासाठी केलेले दैवी नियोजन होते. ‘प्रत्येकातील विविध गुण आणि दादांनी धर्मप्रेमींना केलेले मार्गदर्शन’ यांतून मला शिकण्याची संधी मिळाली.
‘हे श्रीकृष्णा, तू जे शिकवले, ते माझ्याकडून कृतीत उतरवून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२.११.२०२१)