२९ जुलै २०२२ (आज) वडाळामहादेव, नगर येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची जयंती आहे. त्या निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
‘धर्म विनाश’ याचाच अर्थ मानवाचा, मानवतेचा, विश्वाचा विनाश ! म्हणून तर विश्वरक्षणाकरता भगवान अवतरतात. ‘धर्मसंस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।’ धर्म संस्थापना आणि त्याच्या रक्षणाकरता स्वतःच्या जीवनाच्या सर्वस्वाचा होम करणारे ईश्वरकोटीतच गणले जातात. धर्माकरताच जीवन आहे. धर्मातच जगायचे आहे. धर्म जीवनात अशी विलक्षण शक्ती आहे की, सगळे विश्व जरी विरोधात उभे ठाकले, तरी एकटा एकाकी मानव तोंड द्यायला समर्थ बनतो. परमप्रिय माता-पित्याचाही त्याग आणि जिवाचा होम करण्याची शक्ती ‘धर्मच’ देतो. तो पूर्ण तृप्ती आणि शांती देऊ शकतो. असा मनुष्य पूर्णपणे समाधानी आणि परिपूर्ण असतो. धर्माविना समाधान आणि तृप्ती नाही. धर्माविना वैफल्य, निराशा (frustration) आणि बेचैनी !’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जुलै २०१८)
संपादकीय भूमिकाधर्म हाच मनुष्याला पूर्णपणे समाधान, तृप्ती, शांती आणि परिपूर्णता देऊ शकतो ! |