‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार असल्याचे साधिकेला जाणवणे आणि प्रत्यक्षातही तसेच होणे

अनुभूतींच्या माध्यमातून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
सौ. आराधना गाडी

‘१३.७.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमा उत्सव होता. संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहात असतांना माझी अखंड भावजागृती होत होती. जेव्हा ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू झाला, तेव्हा ‘आज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार आहेत’, असे मला वाटले. नामजप संपल्यानंतर सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग यांनी सांगितले, ‘‘सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार आहेत.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची दत्तगुरूंच्या रूपात पाद्यपूजा चालू असतांना मला ‘ते साक्षात् दत्तरूपातच विराजमान आहेत’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसत होते. सनातन पुरोहित पाठशाळेचे ३ पुरोहित मंत्रपठण करत असतांना ‘ते तिघे दत्तगुरुच आहेत’, असेही मला वाटत होते. त्यांच्यातही मला दत्तगुरूंचे दर्शन होत होते. त्यामुळे माझे मन आनंदाने डोलत होते. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

‘हे भगवंता, ही अनुभूती मला केवळ आणि केवळ तुझ्या कृपाशीर्वादामुळेच प्राप्त झाली आहे. त्यासाठी आर्त भावाने हा जीव तुमच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करत आहे प्रभु !’

– सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक