(म्हणे) ‘मी आतापर्यंतच्या सर्वांत स्वादिष्ट गोमातेला तळून खाल्ले !’

केरळमधील काँग्रेसच्या नेत्याने गोमातेचा केला अश्‍लाघ्य अवमान !

डावीकडे काँग्रेसचे नेते आणि अधिवक्ता श्रीदेव सोमन

थिरूवनंतपूरम् – केरळमधील काँग्रेसचे नेते आणि अधिवक्ता श्रीदेव सोमन यांनी फेसबूकवरून गोमांसाचे छायाचित्र प्रसारित केले आहे. त्यांनी फेसबूकवर छायाचित्र पोस्ट करून लिहिले, ‘मी आतापर्यंतच्या सर्वांत स्वादिष्ट गोमातेला तळून खाल्ले आहे !’ याच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केरळमधील नेते जे. नंदकुमार यांनी आक्षेप घेतला असून त्या विरोधात ट्वीट केले. ते म्हणाले की, हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे. दक्षिण भारतातील काँग्रेसचे नेते त्यांचे सर्व मुखवटे बाजूला सारत आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्‍या काँग्रेसचा राजकीय अंत होण्याची वेळ समीप आली आहे, हे तिने लक्षात घ्यावे !
  • अशा प्रकारे गोमातेचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाईच व्हायला हवी !