शिक्षक डिसले यांना ‘डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार घोषित !

सोलापूर – बार्शी येथील ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ‘डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार घोषित झाला आहे. ही माहिती रणजितसिंह डिसले यांनी ट्वीट करून दिली आहे. तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे.