
कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतामध्ये नुकतेच एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे मुसलमानाकडून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आल्यानंतर एका मुसलमानाशी तिचा विवाह लावून देण्यात आला. या प्रकरणी हिंदूंनी आंदोलन करत माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून मुलीला शोधण्यासाठी साहाय्य करण्याची मागणी केली.
१. या मुलीचे नाव करिना असून पोलिसांचे म्हणणे आहे की, तिचे येथील खलील रहमान जोनो या मुसलमान तरुणावर प्रेम होते आणि ती त्याच्यासमेवत पळून गेली. नंतर त्यांनी कराची येथील न्यायालयात जाऊन विवाहासाठी अर्ज केला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे, तसेच मुलीला न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.
२. हिंदु पंचायतचे उपाध्यक्ष लाजपत राय यांनी सांगितले की आमचे एक शिष्टमंडळ पोलिसांना भेटण्यास गेले हेते; मात्र त्यांनी बलपूर्वक धर्मांतराचा गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !