ठाणे येथील लेखक दुर्गेश परुळकर, देहली येथील अधिवक्ता उमेश शर्मा आणि केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी  ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले श्री. दुर्गेश परुळकर, अधिवक्ता उमेश शर्मा आणि श्री. पी.टी. राजू यांची स्थुलातील अन् सूक्ष्मातील  गुणवैशिष्ट्ये

श्री. दुर्गेश परुळकर
अधिवक्ता उमेश शर्मा
श्री. पी.टी. राजू

१७.६.२०२२ या दिवशी गोव्यातील श्री रामनाथ देवस्थानात ‘दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांना एक आनंदवार्ता समजली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ठाणे येथील प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर आणि देहली येथील सर्वाेच्च न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. उमेश शर्मा यांनी अन् १८.६.२०२२ या दिवशी केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पी. टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले’, असे घोषित केले. या भावसोहळ्याच्या वेळी तिन्ही हिंदुत्वनिष्ठांची आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

कृतज्ञता : श्री गुरूंच्या कृपेमुळे तिन्ही हिंदुत्वनिष्ठांकडून विविध गुणवैशिष्ट्ये शिकता आली, यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. ‘त्यांच्यासारखीच भक्ती आम्हा साधकांमध्ये निर्माण होऊ दे’, अशी श्रीगुरूंच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.