काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम् यांच्या घरावर सीबीआयची धाड

उजवीकडे काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम्

चेन्नई (तमिळनाडू) – चिनी नागरिकांकडून ५० लाख रुपयांची लाच घेऊन त्यांना व्हिसा दिल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) अधिकार्‍यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांचे पुत्र तथा काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम् यांच्या घरावर ९ जुलैला धाड टाकली. (बेहिशोबी मालमत्ता किंवा भ्रष्टाचार आदी विविध प्रकरणांत अनेक राजकारण्यांच्या घरावर धाड टाकण्यात येते; मात्र त्यांचे पुढे काय होते ? ‘केवळ धाडी टाकणे पुरेसे नसून दोषींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत’, अशीच जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक) वर्ष २०११ मध्ये त्यांनी अधिकारांचा अपवापर करून २६३ चिनी नागरिकांना व्हिसा दिला होता, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.