नागपूर येथे आजपासून २ दिवसांचे चर्चासत्र चालू !

पंचगव्याद्वारे कर्करोगावर उपचार !

नागपूर – गोविज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे ‘पंचगव्यद्वारे कर्करोगावर प्रभावी उपचार’ या विषयावर देवलापार येथील सेवाधाममध्ये ८ आणि ९ जुलै या दिवशी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. हेमंत जांभेकर म्हणाले की, कर्करोगाचे प्रमाण वाढत असून हा चिंतेचा विषय आहे. पालटती दिनचर्या, रासायनिक अन्नाचा परिणाम, आधुनिक जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत. नॅशनल कँन्सर इन्स्टिट्यूटच्या अनुसार ३९.५ टक्के लोक कर्करोगाने प्रभावित आहेत. गोविज्ञान अनुसंधान केंद्र भारतीय गोवंशियांपासून प्राप्त दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र आदी पंचगव्यांवर संशोधन चालू आहे. गोमूत्र अर्कास अनेक देशांचे पाचहून अधिक आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहेत. चिकित्सालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवरील परिणामही आशादायक आहेत. कर्करोगात शस्त्रकर्मानंतर किमो वा रेडिएशनसमवेतच पंचगव्य आयुर्वेद उपचाराचे यशस्वी अनुभव समोर आले आहेत.