नाशिक येथे मुसलमान धर्मगुरूंची गोळ्या झाडून हत्या

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील चिचोंडी औद्योगिक परिसरात ५ जुलै या दिवशी मुसलमानांचे धर्मगुरु सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (वय ३५ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर घटनास्थळावरून ४ अज्ञात संशयितांनी चारचाकीतून पलायन केले. घटनास्थळी एका भूखंडावर फोडलेला नारळ, उदबत्ती आणि कुंकवाची डबी सापडली. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना कह्यात घेतले असून चालक फरार आहे. चिस्ती हे अफगाणिस्तान येथील असून ४ वर्षांपूर्वी भारतात आले. ते येवला येथे निर्वासित म्हणून रहात होते. या परिसरात ते ‘सूफी बाबा’ म्हणून प्रचलित होते.