धर्मांतर रोखण्यासाठी हिंदु धर्मप्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. मोहन गौडा

कर्नाटक राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू होऊ नये, यासाठी ख्रिस्ती मिशनरी प्रयत्न करत आहेत. धर्मांतरबंदी कायदा आणण्याची मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना करत आहेत. फक्त कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशभरात धर्मांतरबंदी कायदा आणला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह कार्य करत आहे. धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जाईल, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मांतराचा प्रयत्न केला जाणार्‍या ठिकाणी वैध मार्गाने विरोध करण्यासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे. हिंदु धर्माचा सर्वत्र प्रसार करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.