लीना मणीमेकलई यांच्या विरोधात देहली पोलीस आयुक्तांकडे तक्रार

माहितीपटातून श्री कालीमातेचा अवमान केल्याचे प्रकरण

लीना मणीमेकलई

नवी देहली – श्री कालीमातेचा अवमान करणार्‍या चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलई यांच्या विरोधात देहली पोलीस आयुक्तांकडे फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या श्री महाकालीमातेचा अवमान करणार्‍या लीना मणीमेकलई आणि आशा पोन्नाचन् यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधिवक्ता अमिता सचदेव यांनी या तक्रारीत केली आहे.