ठाणे, ५ जुलै (वार्ता.) – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी ५ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी त्यांना सहकुटुंब येण्यासाठी आमंत्रित केले आहे. या वेळी त्यांनी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान केला. या प्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूरचे प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, सदस्य शिवाजी महाराज मोरे, माधवी निगडे, तसेच मंदिर समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.