पुणे पोलिसांनी ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी !

खासदार संजय राऊत यांचे ट्वीट  

पुणे पोलिसांनी सुरक्षा पुरवली

ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंद दवे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत

मुंबई – ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या जिवाला धोका आहे. त्यांनी काळजी घ्यावी. उदयपूरप्रमाणे पुण्यात काही घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. आनंद दवे यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण यंत्रणांना मिळाली होती. पुणे पोलिसांनी आनंद दवे यांनी सुरक्षा पुरवली आहे.