‘आम्ही डोंबिवलीहून गोवा येथे स्थलांतरित झाल्यानंतर माझे यजमान (श्री. विजय लोटलीकर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना अस्थम्याचा (दम्याचा) त्रास चालू झाला. त्यांना १५ दिवस जेवणही जात नव्हते. मलाही गोवा येथे आल्यावर ‘चिडचिड होणे, राग येणे, प्रतिक्रिया येणे’, असे त्रास होत असल्याने ‘काहीच करायला नको’, असे वाटत असे.
१. परात्पर गुरुदेवांनी सांगितल्यानुसार आश्रमातील महाप्रसाद ग्रहण केल्यावर यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागणे
परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्या मुलीला (कु. प्रियांकाला (आताच्या सौ. प्रियांका गाडगीळ) आश्रमातील महाप्रसादाचा डबा श्री. विजय यांना पाठवण्यास सांगितले. त्यांनी श्री. विजय यांच्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजप विचारायला सांगितला. त्या दिवशी यजमानांना पाऊण मासाच्या कालावधीनंतर जेवण गेले. तेव्हापासून यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.
२. सद्गुरु गाडगीळकाकांनी आम्हाला नामजप आणि वास्तूशुद्धी करायला सांगितली. आम्ही ८ दिवस प्रतिदिन ४ – ५ वेळा वास्तूशुद्धी केल्यावर आमचा त्रास न्यून होऊ लागला. तेव्हा माझी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
३. त्या वेळी मला वाटले, ‘आपल्याला बाह्यतः वास्तू चांगली आहे’, असे वाटत असले, तरीही त्या वास्तूत त्रास असू शकतात.’
– सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा.
|