अलिगड – शिक्षणाधिकार्याच्या कपाळावर टिळा लावून त्यांचे स्वागत करणार्या ताहिरा परवीन या शिक्षिकेवर मुसलमान शिक्षकाने टीका केली आहे. या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकार्यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
अलीगढ़ में शिक्षिका ताहिरा परवीन ने शिक्षा अधिकारी के माथे पर तिलक लगा किया स्वागत, मुस्लिम टीचर हराम बता पढ़ाने लगे ईमान का पाठ#Uttarpradesh https://t.co/lc4xmUf57u
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 28, 2022
याविषयी माहिती देतांना शिक्षिका ताहिरा परवीन म्हणाल्या की, १५ जून या दिवशी विभागीय शिक्षण अधिकारी सतीश चंद्र हे एका कार्यक्रमासाठी आले असता परंपरांचे पालन करत त्यांचे टिळा लावून स्वागत करण्यात आले. या स्वागताविषयीचे छायाचित्र उर्दू शिक्षक महंमद अहमद यांच्या हाती लागले. त्यांनी हे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले, तसेच या छायाचित्राविषयी शिक्षकांच्या व्हॉॅट्सअॅप गटामध्ये विविध प्रकारची बेताल वक्तव्ये केली. अहमद याची विचारसरणी वाईट आहे. ते हे प्रकरण हिंदु-मुसलमान या रूपात पहात आहेत. अधिकार्यांना टिळा लावून आपण विभागातील परंपरांचे पालन केले आणि एकात्मतेचा संदेश दिला. माणुसकी शिकवणे, हे शिक्षकाचे काम आहे आणि तोच मानवतेचा धर्म आहे. याउलट महंमद हे त्यांच्या कृतीतून मुलांना कोणते शिक्षण देत आहेत ?, हे लक्षात येते. याविषयी मी तक्रार केली आहे.
संपादकीय भूमिकाटिळा लावण्याला विरोध करणार्या अशा शिक्षकांची हिंदुद्वेषी मानसिकताच यातून दिसून येते ! असे शिक्षक विद्यार्थ्यांना एकसंध काय राखणार ? |