केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षे’च्या घोटाळ्याप्रकरणी त्यागपत्र दिले, ‘जेन झी’चा (वर्ष १९९७ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्मलेल्या पिढीचा) विजय. नक्कीच. चला, आता बहुतेक सगळी झुरळे (कॉकरोच जनता पक्षाचे कार्यकर्ते) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रश्नांवर पंजाब आणि कर्नाटक येथील शिक्षणमंत्र्यांच्याही त्यागपत्राची मागणी करतील (?) तिथे अनुक्रमे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांचे सरकार सत्तेत आहे, तसेच आता बहुतेक मोठे आंदोलन केरळमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांविषयी काँग्रेसने उत्तरदायित्व घ्यावे म्हणूनही होईल !

वर्ष २०१० मध्ये दंतेवाडा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७६ सैनिकांनी माओवाद्यांच्या आक्रमणात स्वतःचा जीव गमावला. ते माओवादी इतिहासातील सगळ्यात भीषण आक्रमण होते. त्या वेळी काँग्रेस नेते तथा तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांना भाजपने सांगितले, ‘तुम्ही त्यागपत्र दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही. उलट तुमचे त्यागपत्र हा या देशविरोधी नक्षलवाद्यांचा विजयच असेल. त्यामुळे योग्य त्या भाषेत या नक्षल्यांना उत्तर द्या.’ ‘उत्तरदायित्व घेणे, म्हणजे पळ काढणे नसून यंत्रणेत खर्या अर्थाने सुधारणा करणे होय. यंत्रणा उखडून फेकून द्या आणि सामाजिक राजकीय अराजकता निर्माण करा’, हा विचारधारेचा गाभा असलेल्यांना राजकीय दायित्व घेणे आणि यंत्रणेत सुधारणा घडवून आणणे, म्हणजे नक्की काय असते, हे कधीही कळणार नाही.
– डॉ. (प्रा.) शांभवी थिटे, साहाय्यक प्राध्यापक, ‘कुमारागुरु ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन’, कोईम्बतूर, तमिळनाडू.

कारगिल : एक संहारक यशोगाथा !
संपादकीय : शिक्षणमंत्र्यांचे त्यागपत्र, पुढे काय ?
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !