पाकमध्ये पोलिओ डोस देणार्‍या पथकावर आक्रमण : २ पोलीस आणि १ कार्यकर्ता ठार

उत्तर वजीरिस्तान (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तरी वजीरिस्तान जिल्ह्यात पोलिओचा डोस देण्यासाठी गेलेल्या एका पथकावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबार २ पोलीस आणि १ पोलिओ कार्यकर्ता यांचा मृत्यू झाला, तर १ लहान मुलगा घायाळ झाला.

सध्या पाकमध्ये देशभरात १ कोटी २६ लाख मुलांना पोलिओचा डोस देण्याचे अभियान राबवण्यात येत आहे. उत्तर वजीरिस्तानमध्ये यावर्षी पोलिओचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. या पथकावरील आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेले नाही.