सद्गुरूंच्या सत्संगातून सिद्ध होऊन सर्वांसाठी ती आधारस्तंभ बनली ।

सौ. मनीषा पाठक
आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा नितीन कोठावळे

दासनवमीला एका सुंदर मनीषाचा जन्म झाला ।
जन्मापासून देवाने तिच्यावर केले सुंदर संस्कार ।। १ ।।

गुरुदेवांनी तिला एका कोमल फुलाप्रमाणे जपले ।
सद्गुरूंच्या सत्संगातून सिद्ध होऊन सर्वांसाठी ती आधारस्तंभ बनली ।। २ ।।

स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करून इतरांसाठी ती सतत झटत असते ।
सर्व साधक कसे पुढे जातील ? अशी तिची तळमळ असते ।। ३ ।।

प्रेमभाव, नम्रता, तळमळ आणि भक्ती ।
चिकाटी, अभ्यासूपणा, गुण सांगू मी किती ।। ४ ।।

देवा, तिच्याप्रमाणे बनता येऊ दे ।
हीच प्रार्थना आहे गुरुचरणी ।। ५ ।।

– आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा नितीन कोठावळे, कोल्हापूर (२५.०२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक