हरिद्वार येथील कुंभमेळ्याच्या ठिकाणी वादळी पावसाच्या वेळी साधकांनी एकजुटीने केलेल्या कृतीतून क्षात्रतेजाची अनुभूती येणे

१. वादळ आणि पाऊस येत असतांना साधकांनी स्वयंस्फूर्तीने आणि एकजुटीने आवश्यक त्या गोष्टींवर ‘फ्लेक्स’ आणि मोठी ‘प्लास्टिक’ची ताडपत्री घालणे

२२.३.२०२१ या दिवशी रात्री हरिद्वार येथे पुष्कळ वेगाने वादळ आले. तेथील कुंभमेळ्यात सेवा करणाऱ्या साधकांच्या निवासस्थानी आणि स्वयंपाकघर येथे वाऱ्यामुळे पुष्कळ माती उडून येऊ लागली. त्या वेळी पाऊसही येऊ लागला. अशा स्थितीत सर्व साधक बाहेर आले आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने अन् एकजुटीने काही मिनिटांतच आवश्यक त्या गोष्टींवर ‘फ्लेक्स’ आणि मोठी ‘प्लास्टिक’ची ताडपत्री घातली.

२. साधकांच्या कृतीतून ‘संघभाव कसा असायला हवा ?’, हे अनुभवता आल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

साधकांची ही कृती पाहून मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘सर्व साधक एकजुटीने धर्मरक्षण करणार आहेत’, असे मला वाटत होते. त्या वेळी ‘संघभाव कसा असायला हवा ?’, हे मला अनुभवता आले. त्यानंतर मी पुष्कळ वेळ आनंद अनुभवत होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला हे अनुभवायला दिले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !

– श्री. राहुल किंगर, हरिद्वार (७.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक