|
कर्णावती (गुजरात) – गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर्.बी. श्रीकुमार यांना कर्णावती पोलिसांनी गुजरातमधील वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलींच्या प्रकरणी अटक केली. याविषयी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे (‘इस्रो’चे) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी समाधान व्यक्त केले आहे. नारायणन् म्हणाले की, सीबीआयने वर्ष १९९४ मध्ये ‘इस्रो’तील कथित हेरगिरीच्या प्रकरणी मला फसवले होते. त्यामागेही सीबीआयचे तत्कालीन अधिकारी श्रीकुमार हेच होते.
१. गुजरात दंगलींच्या काळात श्रीकुमार यांनी निराधार आणि खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. दंगलींच्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांना सर्वाेच्च न्यायालयाने निर्दाेष घोषित केल्यानंतर एका दिवसाच्या आतच श्रीकुमार यांना अटक करण्यात आली.
२. वर्ष १९९४ मध्ये नंबी नारायणन् यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता. पुढे सर्वाेच्च न्यायालयाने नारायणन् यांना निर्दाेष घोषित केले.
३. श्रीकुमार यांना केलेल्या अटकेसंदर्भात नारायणन् म्हणाले की, श्रीकुमार यांनी बनावट प्रकरणे सिद्ध केल्याने त्यांना अटक करण्यात आली. माझ्यासंदर्भातही त्यांनी असाच प्रकार केला होता. आज त्यांना अटक झाल्याने माझे समाधान झाले आहे.