‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा मे २०२२ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

सद्गुरु सिरियाक वाले

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

२. ‘ऑनलाईन’ प्रसार

एस्.एस्.आर्.एफ्. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘पिंटरेस्ट’ आणि ‘टेलिग्राम’ या सर्व वाहिन्यांची मे २०२२ पर्यंतची एकूण सदस्यसंख्या ३ लाख ३० सहस्र ७६० असून या मासात १३ सहस्र ६५ जिज्ञासूंनी या सर्व वाहिन्यांच्या माध्यमांतून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.

३. संकेतस्थळावर जगातील ८ भाषांमध्ये लेख ठेवण्यात येणे

मे २०२२ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर चिनी, इंडोनेशियन, इटालियन, फ्रेंच, क्रोएशियन, हंगेरियन, पोर्तुगीज आणि रशियन, या ८ भाषांमधील एकूण २२ लेख ठेवण्यात आले.

४. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)

याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, सर्बाे-क्रोएशियन, फ्रेंच, इंडोनेशियन आणि रशियन, या ७ भाषांतील १ सहस्र १२ वाचकांशी संवाद साधता आला.

५. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !

एप्रिल २०२२ मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया, रशिया अन् मॅसेडोनिया येथे सर्बियन आणि क्रोएशियन या भाषांत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत, तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ८ ‘ऑनलाईन’ व्याख्याने अन् ३ कार्यशाळा घेण्यात आल्या. ७०६ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर १० जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.

६. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या

७. जगभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप १) १९० देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.

टीप १ – सध्या जगभरात एकूण १९५ देश आहेत. त्यांतील १९३ देश ‘संयुक्त राष्ट्रां’चे सदस्य आहेत. २ देश (‘होली सी’ आणि ‘स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’) संयुक्त राष्ट्रांत केवळ पर्यवेक्षक आहेत, म्हणजे ‘संयुक्त राष्ट्रा’च्या बैठकांना पर्यवेक्षक म्हणून बसू शकतात. या व्यतिरिक्त ‘संयुक्त राष्ट्रा’च्या ११ व्या सनदी अध्यायात १७ स्वयंशासित नसलेले प्रदेश आहेत. तेथील लोकांनी अजून स्वतःचे शासन प्रमाणित केलेले नाही. ‘संयुक्त राष्ट्रा’च्या काही सदस्य देशांकडे अशा प्रदेशांचे प्रशासकीय अधिकार आहेत.

श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !

– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (जून २०२२)