बशील मंसूरीने ‘महेश’ बनून हिंदु मुलीशी केला विवाह !

इंदूर (मध्यप्रदेश) मध्ये लव्ह जिहादची घटना !

इंदूर (मध्यप्रदेश) – लव्ह जिहादचे नवे प्रकरण समोर आले असून बशील मंसूरी उपाख्य महेश या मुसलमानाने स्वत:चा धर्म लपवून एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह केला. हिंदु पीडितेने याची तक्रार पोलिसांत प्रविष्ट केली आहे.

पीडिता आणि मंसूरी यांचा वर्ष २०१८ मध्ये विवाह झाला. पुढे वर्ष २०२१ मध्ये पीडितेला समजले की, महेश हा हिंदू नसून मूळचा बशील मंसूरी आहे. यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. पुढे पीडिता गर्भवती राहिली; परंतु मंसूरीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. पोलिसांनी मंसूरीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात असल्याने अशा प्रकरणांच्या विरोधात कारवाईचा मार्ग खुला असला, तरी भविष्यात हिंदु मुलींच्या वाट्याला कुणी हिंदुद्वेषी मुसलमान जाऊच नये, यासाठी पकडण्यात आलेल्या लव्ह जिहाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !