दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात व्हिडिओच्या माध्यमातून सहभाग
काश्मीरमध्ये ज्ञान होते; परंतु शक्ती नव्हती. त्यामुळे काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागले. त्यामुळे हिंदूंना शक्ती आणि भक्ती या दोघांची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे आपले लक्ष्य आहे. एकत्र येऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. वेळ द्यावा लागेल. समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंदूंच्या मनातील ही भीती घालवून समाजामध्ये विश्वास आणि क्षात्रतेज निर्माण करावे लागेल. काश्मीर, केरळ, देहली, बिहार, कर्नाटक येथे जे झाले, ही येणार्या कठीण काळाची पूर्वसूचना आहे. याचा सामना करण्यासाठी ध्येय आवश्यक आहे. यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्ती वाढवायला हवी. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेनशनामध्ये मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपणाला कार्य करायचे आहे, असे आवाहन कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले.
तत्कालीन गोवा सरकारने राज्यबंदी घातल्यामुळे श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘व्हिडिओ’द्वारे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील प्रतिनिधींशी संवाद साधला.