१. विविध क्षेत्रांतील असूनही हिंदुत्वनिष्ठांमध्ये दिसून आला धर्मबंधुत्वाचा भाव ! : दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला भारतातील विविध राज्यांतील, तसेच अन्य देशांतूनही हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. विविध हिंदुत्वनिष्ठांची भाषा वेगवेगळी असल्याने भाषेची अडचण असूनही ‘सर्व हिंदुत्वनिष्ठ हिंदुत्वाच्या विचाराने जोडले आहेत’, असे अनेक प्रसंगांत जाणवले. त्यामुळे प्रांत आणि भाषा वेगळी असली, तरी सर्व हिंदुत्वनिष्ठांमध्ये धर्मबंधुत्वाचा भाव दिसून आला. काही वक्त्यांना हिंदी भाषेतून बोलण्याचा सराव नसल्याने भाषण करतांना अडचण आली. असे असूनही त्यांचा धर्मकार्यातील सहभाग आणि धर्मकार्यातील प्रत्यक्ष योगदान यांमुळे त्यांचा विषय ऐकतांना उपस्थितांना उत्साह वाटत होता.
२. अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित उद्योजक तथा ‘सेटोलॉजी’ यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. आदित्य सत्संगी हे ८ दिवसांसाठी भारतात आले आहेत. असे असूनही ते जिज्ञासेपोटी वेळात वेळ काढून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहिले.
३. मध्यप्रदेश येथील ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या अध्यक्षा मीनाक्षी शरण यांनी श्री केदारनाथ आणि श्री बद्रीनाथ या देवतांच्या चरणांवर अर्पण केलेली चैतन्यमय पुष्पे प्रसादरूपाने अधिवेशनाच्या आयोजकांकडे सुपूर्द केली.
४. काशी विश्वनाथ मंदिर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी ज्ञानवापीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा वेळ घेऊन पत्रकारांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली.