
पाटलीपुत्र (बिहार) – नुपूर शर्मा यांनी केलेल्या महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानावरून गेल्या काही दिवसांत मुसलमानांकडून देशात काही ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. आता बिहारच्या आरा, तसेच वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथे हिंदूंकडून शर्मा यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने हिंदू सहभागी झाले होते.
हाजीपूर येथे हिंदूंकडून मशिदीसमोर निदर्शने !
हाजीपूर येथे १४ जून या दिवशी ‘हिंदू पुत्र’ संघटनेकडून आरतीनंतर येथील मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. या वेळी त्यांच्याकडून ‘नूपुर शर्मा संघर्ष करा, आम्ही तुमच्या समवेत आहोत’, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘पाकिस्तान समर्थक मुर्दाबाद’, ‘लव्ह जिहाद मुर्दाबाद’, ‘इस्लामी जिहाद मुर्दाबाद’ अशाही घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी आले.
हाजीपुर में नूपुर शर्मा के समर्थन में प्रदर्शन, हिन्दू पुत्र संगठन उतरा सड़क पर। pic.twitter.com/LGVzflJWGT
— News18 Bihar (@News18Bihar) June 14, 2022
हिंदूंना छेडाल, तर तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही !
आरा येथील रमना मैदानामध्ये नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी सभा आयोजित केली होती. यानंतर एक मोर्चाही काढण्यात आला. यात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या.
Nupur Sharma : ‘नुपुर शर्मांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्ही 100 कोटी लोकांना झेलू शकणार नाहीत’, बिहारमध्ये हिंदू संघटनांचा इशारा, ‘जय श्री राम’ची नारेबाजी https://t.co/XkeVGjtHJR @BJP4India @NupurSharmaBJP @BJP4Bihar #NupurSharma #nupursharmabjp #HinduOrganization #Bihar
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 15, 2022
तसेच ‘नूपुर शर्मा यांना काही झाल्यास १०० कोटी लोकांना तुम्ही सहन करू शकणार नाही’, अशी घोषणाही देण्यात आली. ‘जर तुम्ही हिंदूंना छेडाल, तर तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही’, असेही सांगण्यात आले.
Mathura Krishna Janmasthan Donation : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळणार्या देणगीची चौकशी व्हावी ! – हिंदुत्वनिष्ठ दिनेश फलाहारी
Satyaki Savarkar : उलटतपासणीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी सडेतोड उत्तरे देऊन राहुल गांधी यांच्या अधिवक्त्यांचे मनसुबे उधळले !
३ तक्रारी प्रविष्ट करूनही अद्याप गुन्हा नोंद नाही !
NEET Exam Paper : भारतीय वायूदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका अकोल्यात पोचल्या !
Operation Tiger : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार फुटले : शिवसेनेत सहभागी होण्याची शक्यता !
‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरत्या बंदीला देहली उच्च न्यायालयात आव्हान