‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर कपूर बूट घालून मंदिरात गेल्याचे दाखवण्यात आल्याने हिंदूंकडून विरोध

‘ब्रह्मस्त्र’ चित्रपटात रणबीर कपूर बूट घालून मंदिरात गेल्याचे दृश्य

मुंबई – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) १५ जून या दिवशी प्रदर्शित झाला आहे. यात ‘शिवा’ नावाची भूमिका करणारा अभिनेता रणबीर कपूर मंदिरामध्ये बूट घालून गेल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळे त्याला विरोध केला जात आहे. चित्रपटाच्या विरोधात ट्विटरवर  #BoycottBrahmastra हा ट्रेंड करण्यात आला. अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ९ सप्टेंबर या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

बॉलिवूड चित्रपट हे हिंदुविरोधी कारवायांचे माध्यम बनले आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! अशा बर्‍याच चित्रपटांच्या संदर्भात हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्याचे सांगूनही चित्रपटातील संबंधित भाग काढून टाकण्यासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळही काही करत नाही. त्यामुळे हिंदूंनीच अशा चित्रपटांवर बहिष्कार टाकून संबंधितांना ताळ्यावर आणावे !