अनौरस मुलाचाही वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रहित

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र रहात असतील, तर तो विवाह मानला जाईल अन् या नात्यातून जन्माला आलेल्या (अनौरस) मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत अधिकार मिळेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. यासाठी ‘डीएन्ए चाचणी’ करून तो त्या पुरुषाचाच मुलगा आहे, हे सिद्ध करावे लागेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. विवाह न करता एकत्र रहाणार्‍या दांपत्याच्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानण्यास नकार देणारा केरळ उच्च न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने रहित केला.

असेच प्रकरण उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री अन् काँग्रेसी नेते नारायण दत्त तिवारी यांच्यासंदर्भात घडले होते. रोहित शेखर हा त्यांचा अनौरस पुत्र होता, ज्याला त्यांच्या मालमत्तेतील वाटा नाकारण्यात आला होता. पुढे न्यायालयात रोहित हा त्यांचाच मुलगा असल्याचे सिद्ध झाले.