१३.६.२०२२ या दिवशी अधिवेशनात मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय फेसबूकच्या माध्यमातून २१ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींपर्यंत पोचला, तसेच ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि २ सहस्र १०० हून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.
हिंदु राष्ट्र अधिवेशन हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनलद्वारे ६ सहस्र १०० हून अधिक धर्मप्रेमींनी पाहिले.
ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.